WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जनतेसाठी कर्तव्यावर असलेल्यांना सॅनिटायझर चे वाटप.....

Image

तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित :- खाकितील माणुसकीला क्रांती युवा तर्फे काळजी चा हाथ....

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

जगात सुरू असलेला कोरोनाचा हाहाकार पाहता कर्तव्यावर असलेल्या खाकितील माणुसकीला क्रांती युवा संघटनेने काळजीचा हाथ दिला आहे. देशाची महत्वाची जबाबदारी म्हणजे शांतता व सुव्यवस्था ज्या विभागावर आहे तोच विभाग जर सुुरक्षीत नसला तर इतर कसेकाय सुरक्षित राहणार? याकरिता वणी पोलीस विभागाला व वाहतूक विभागाला 100 सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

संपूर्ण जगात सद्यस्थितीत कोरोनाची दहशत असून त्यातून सावरण्याकरिता संपूर्ण भारतात आचारसंहिता आहे. त्याला काटेकोरपणे पूर्णत्वास नेण्याकरिता पोलीस विभाग हा महत्वाचा असून वणी तालुक्यात सुद्धा वणी पोलीस महत्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे, मात्र जर पोलीस विभागच सुरक्षित नसेल तर आपण सुरक्षित कसे? असा प्रश्न येथील क्रांती युवा संघटनेचे संस्थापक, व्यापारी असोसिएशन वणीचे अध्यक्ष तथा माजी नागराध्यक राकेश भाऊ खुराणा व मित्र परिवार यांना पडला त्यामुळे त्यांनी पुढाकार घेत खाकितील माणुसकी जपणारे रक्षक वणी पोलीस स्टेशनला 100 सॅनिटायझर चे वाटप करून तुम्ही सुरक्षित राहिले तरच आम्ही सुरक्षित राहू असा एक सूर दिला आहे. तसेच सध्यास्थितीत युद्धपातळीवर कार्यरत असलेले वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचारी याना सुद्धा सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले यावेळी राकेश भाऊ खुराणा, सी. ए. निलेश कटारिया, रोटे निकेश गुप्ता, जमीर खान, लवली लाल, बबलू अहेमद, कपिल जुनेजा, रोटे निखिल केडीया, वैभव खडसे आदी क्रांती युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कर्तव्यावर असलेल्या ठीकानी त्यांना सॅनिटायझर चे वाटप केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले