WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना काळात रेकॉर्ड तोड 202 रक्तदात्यांनी केले रक्तदान.....

Image

व्यापारी असोसिएशन चा पुढाकार :- संकलन पिशवी कमी पडल्याने रक्तदाते गेले परत....

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

सध्या स्थितित कोरोनाचा कहर जगभरात सुरू असुन रक्तपेढ्यातील रक्तसाठा आता सम्पूष्ठात आला होता ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेता अशा आणीबाणीच्या काळात व्यापारी असोसिएशन वणी तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेकॉर्ड तोड 202 रक्तदात्यानी रक्तदान करून कोरोनाच्या अति महत्वाच्या काळात रक्तदान श्रेष्ठ दान समजून रक्तदात्यानी रक्तदान केले आहे. त्यातच रक्तसंकलं न पिशव्या कमी पाडल्यामुळे काही रक्तदाते आल्यापावली परत परतले.

व्यापारी असोसिएशन वणी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील श्री राम मंदिर खाती चौक येथे दिनांक 11 ला, सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत करण्यात आले होते कोरोना सारखा जीवघेणा आजार लक्षात घेता व रक्ताची कमतरता पाहता व्यापारी असोसिएशन ने या काळात महत्वपूर्ण शिबिराचे आयोजन केले होते जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा व्यापारी असोसिएशन तर्फे करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदात्यानी रक्तदान केले तसेच जीवणज्योति रक्तपेढी नागपूर यांची चमू त्यातील डॉ अनिल नामपल्लीवार, किशोर खोब्रागडे, अरुण मोरांडे, संदीप लाओल व त्यांची चमू यांनी उत्कृष्ठ कार्य बाजाविले. तसेच वणीतील तरुनपिढी सुद्धा आणि बाणीच्या काळात अतिशय खम्बिर पणे समोर येऊन रक्तदान केल्याने सदर नागपूर येथील जीवणज्योतिच्या रक्त पेढीने सुद्धा आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाऊ खुराणा, उपाध्यक्ष राजू गुंडावार, सचिव अनिल आक्केवार, कोषाध्यक्ष लवलेश लाल, सहसचिव संजय पांडे, कार्यकारिणी सदस्य किशन खुंगर,रमेश येरने,रवि निखार,दीपक छाजेड,भगवान तारुणा, अनुज मुकेवार तसेच वणीतील सि ए निलेश कटारिया, दीपक दीकुंडवार, गौरीशंकर खुराणा, कपिल जुनेजा, श्याम ठाकरे, जमीर खान, आतिष बुरेवार, अमन कुलदिवार, अविनाश भुजबलराव, सुनील चिंचोळकर, विशाल किन्हेकार, धनू भोयर, बबलू अहेमद व समस्त व्यापारी असोसिएशन वणी च्या सदस्य गणांनी मोलाचे सहकार्य केले.

संस्थातील सर्वात जास्त रक्तदानाचा रेकॉर्ड ... डॉ अनिल नामपल्लीवार....

वणित पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 202 ररक्तदात्यानी रक्तदान केले अजून पर्यंत आमच्या पेढीत संस्थांमार्फत ही पहिलीच रक्तदानाचा विक्रम असून रेकॉर्ड तोड विक्रम व्यापारी असोसिएशन ने केला आहे असे जीवणज्योति रक्तपेढी नागपूर चे डॉ अनिल नामपल्लीवार यांनी बोलून दाखविले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share