WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाँकडाऊनच्या फटक्यात१८मजुराचा मारेगांवात मुक्काम, सामाजिक दातृत्वांनी केली भोजनाची व्यवस्था

Image

•ही वाट दुर जाते स्वप्नामधील गावा....!!

•मध्यप्रदेश च्या मजुरांची हैदराबाद वरुन पायदळ वारी...!!

प्रतिनिधी/सचिन मेश्राम (मारेगाव)

घरात अठराविश्व दारिद्र्य... जगन्याचा संदर्भ आयुष्याला चिकटलेला... गावकुसाबाहेर बाहेर एकही उद्योग धंदा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रांताचा आसरा तब्बलं अठरा कुटुंब प्रमुखांनी घेतला.. मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे वेळापत्रक ठरविले.. काही दिवस सुगीचे गेले.. हैदराबाद मध्ये काम मिळाले अन अवघ्या दिवसातच कोरोणा विषाणूची मेहेरनजरेने कामाचे हात रिकामे केले. जगण्याचा प्रश्नही ऐरणीवर आल्याने मध्यप्रदेशतील बालाघाट नजिकच्या वाराशिवणी येथील अठरा मजुरांनी हैदराबाद वरुन पायदळ वारी करून मायभूमीत जाण्याचा मार्ग निवडला. आंध्रप्रदेशातील प्रशासनाने महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत व्यवस्था केली. मात्र महाराष्ट्र प्रशासन इथे थिटे पडुन या मजुरांनी थेट पायदळ मारेगांव गाठले. येथे सामाजिक दातृत्व दाखवित प्राचार्यांनी महाविद्यालयात निवासाची व्यवस्था केली तर काहींनी भोजनाची! दुसऱ्या दिवशी सकाळी सुर्य उगवताच मजुरांनी पुन्हा पायदळ वारी करित मध्यप्रदेशात कुच केली.. ही वाट दुर जाते स्वप्नामधील गांवा.. म्हणत

मध्यप्रदेशातील बालाघाट नजिकच्या गावखेड्यातील मजुरांना हाताला काम नसल्याने मिळेल ते काम करण्यासाठी वाराशिवणी येथील अठरा कुटुंब प्रमुखांनी काही महिन्यापुर्वी थेट हैदराबाद गाठले. सर्वांना काम मिळाल्याने कुटुंब व प्रमुखाच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा उमटत होती. मात्र जगाला कोरोना विषाणूचा विळखा घातल्याने त्याचा फटका भारतातालाही बसला. भारताच्या वेगवेगळ्या प्रातांत लाँकडाऊन, संचारबंदी लावण्यात आल्याने सर्वाचे कामाचे हात रिकामे झाले. सर्वसामान्य व दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या मजुरांचे जिवण जगण्याचे प्रश्न ऐरणीवर आल्याने मजुरांचे बेहाल होत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे.

असाच एक प्रसंग १४एप्रिल रोजी मारेगांवकरांनी अनुभवला. मध्यप्रदेश राज्यातील वाराशिवणी येथील मजुर हैदराबाद येथे काम करण्यास गेले. सर्वत्र बंद ची अवस्था पाहून मजुरांनी गड्या आपला गाव बरा'' म्हणुन मध्यप्रदेश पायदळ वारी सुरू केली. आंध्रप्रदेशातील.काही अंतर गाठत असताना आंध्रप्रदेश पोलीस प्रशासनाने सौजन्य दाखवित महाराष्ट्राच्या सिमेलगत वाहनाने सोडण्यात आले. मात्र महाराष्ट्र प्रशासनाने मजुरांना वाऱ्यावर सोडत थेट पिंपळखुटी वरुन हे मजुर पायदळ मारेगांव पर्यंत मंगळवारला रात्री पोहचले. प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी निवासासाठी महाविद्यालयातील सभागृह उपलब्ध करून दिले. तत्पूर्वी नगरपंचायतने हा परिसर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी केली. सामाजिक वलय असलेल्या सामाजिक कार्यकर्ता दुष्यंत जयस्वाल बदुद्धीन सय्यद सह सादिक शेख यांनी भोजनाची व्यवस्था केली. धिरगंभीर मनाने या मजुरांनी मारेगांवात रात्र काढली. सकाळी सुर्य उगवताच मजुरांनी पुन्हा मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी कुच केली. ओथंबलेल्या भावणांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटत असतांना ही वाट दुर जाते... स्वप्नामधील गावा... म्हणत मारेगांवकरांचा निरोप घेतला. कोरोणा विषाणूने मजुरांना फटका लावित पुन्हा३००कि .मी. अंतर गाठण्याचा प्रसंग ओढविला मात्र मारेगांव प्रशासनाची रवानगी करण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न ईथे थिटे पडल्याचे जाणवत होते. हे दुर्दैवाने म्हणणे वावगे ठरू नये.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share