WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदर्श टेक्निकल इन्स्टिट्यूट कडून तहसील कार्यालयात सॅनिटायजर युनिट भेट खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सुरुवात

Image

वणी
देश सर्वत्र कोरोना विषाणू चा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव बघता, देशातील लॉगडाउन वाढविण्या संदर्भात निर्णय देखील घेण्यात आला आहे कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायजर व हँड वॉश करणे अत्यंत आवश्यक गरज झाली आहे, अशी च गरज लक्षात घेता सध्या मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ तहसील कार्यालयात असते त्यामुळे आदर्श टेक्निकल इन्स्टिट्यूट व आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ एफ्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे अवचित्य साधून खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात तयार केलेले सॅनिटायजर युनिट भेट देण्यात आले,,,
महाविद्यालयातील व टेक्निकल इन्स्टिट्यूट यातील शिक्षकांनी देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव या पासून काही प्रमाणात बचाव करण्याकरता लॉगडाउन च्या काळातही या महामारी वरील उपाय म्हणून मेहनत घेत आणि आपल्या जवळ असलेल्या पाईप,मोटार,वायर,स्वाच इत्यादी साहित्याचा उपयोग करून वणी तहसील कार्यालयात पाहिले तयार केलेले सॅनिटायजर युनिट भेट दिले,यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे,तहसीलदार धनमाणे साहेव,नगरपरिषद मुख्यधिकारी संदीप बोरकर,आरोग्य अधिकारी पंचायत समिती कांबळे साहेब उपविभागीय पोलीस अधीक्षक नायक साहेब,ठाणेदार जाधव साहेब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची सर्वप्रथम युनिट मध्ये प्रवेश करून सर्वांकरित सुरू करून दिले व सर्वांनी कौतुक केले,हे युनिट तयार करण्याची कल्पना आदर्श टेक्निकल इन्स्टिट्यूट व आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी संचालक रवींद्र गौरकार यांची होती याला सहकार्य अक्षय मोहितकर,प्राजक्त चेलपेलवार,हनुमान झिलपे,महेश पुंड, आनंद बन्सोड,विशाल ठेंगणे यांच्या मेहनतीने साकार झाले,यापुढे आणखी पोलीस ठाण्यात, नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालयात इत्यादी ठिकाणी देण्याची तयारी आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share