WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी उपविभागात गारपिटीसह पाऊस

Image

वणी : उपविभागातील वणी तालुक्यासह मारेगाव, तर केळापूर उपविभागातील पांढरकवडा झरी व झरी तालुक्यात रविवारी पहाटे २ वाजतानंतर वादळासह मुसळधार पाऊस कोसळला.

काही भागात मोठ्या प्रमाणावर गारपिट झाली. झरी तालुक्यात चिचघाट येथे गोठ्यावर वीज कोसळली. त्यात संपूर्ण गोठा जळून खाक झाला. सुदैवाने प्राणहानी टळली. वणी येथे बाजार समितीच्या आवारातील धान्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर ओले झाले. त्याचा फटका शेतकरी व व्यापाºयांना बसला. पहाटे ५ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पांढरकवडा तालुक्यातील रूंझा, वाठोडा, जिरा, मिरा, मोहदा या भागात रात्री १२.३० वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. पहाटेदेखील काही भागात रिमझीम पाऊस सुरूच होता. पांढरकवडा परिसरात सकाळी ढगाळ वातावरण होते. मारेगाव तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळ विभागात पहाटे २.३० वाजतापासून तुरळक पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस सकाळी ९ वाजेपर्यंत कोसळत होता. मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरूवात झाली. या परिसरात गारपिटही झाली

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share