WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

केशकर्तकांनांही शासना तर्फे मदत देण्याची मागणी

Image

कोरोना संसर्गाची रोखथाम करण्याकरिता लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक दुकाने वगळता संपुर्ण व्यवसायिक बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. याचा फटका केशकर्तनालयांना ही बसला असून लॉकडाऊन जाहिर झाल्या पासुन शहरातील सर्वच सलून बंद असल्याने एकिकडे जनतेच्या डोक्यावरील भार वाढला आहे तर दुसरीकडे सलून व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्मान झाले आहेत. त्यामूळे लॉक डाऊन च्या काळात रोजगार हिरावलेल्या सलून व्यवसायिक व त्यांच्या कारागिरांना शासनाने मदत जाहिर करावी अशी मागणी या नाभिक समाजाकडुन होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता शासनाने सोशल डीस्टन्सीगचा अवलंब करित जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु ठेवण्याचा आदेश दिल्याने केशकर्तनालये ही मागिल एक महिन्यांपासुन बंद आहेत. कटिंग व दाढी करतांना केशकर्तकांना नागरिकांशी अगदी जवळीक साधावी लागत असल्याने संसर्गचा धोका उध्भऊ शकतो या करणास्तव या व्यावसायिकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पारंपरिक व्यवसायच बंद पडल्याने त्यांना उपजिविकेचे प्रश्न पडले आहेत. किमान दिवसातनं काही तासांककरिता सलून चालू ठेवण्याची मुभा देण्याची तसेच गरिब केशकर्तक व कारागिरांना योग्य ती मदत देण्याची मागणी नाभिक समाज संघटणांकडून करण्यात येत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share