WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निवडणुकांमध्ये वारेमाप पैसे उधळणारे पुढारी कोरोना संकटात गेले तरी कुठे ?

Image

कोरोना या सथीच्या आजारान देशात हळू हळू पाय पसरवायला सुरुवात केली असून महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला. २५ तारखेपासून सुरु झालेलं हे लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवण्यात आलं. यात रोजगारा अभावी हजारो मजुरांची उपासमार झाली. अवकाळी पावसाने शेतातील पिके व फळबागाही उध्वस्त झाल्या. सीमाबंदीमुळे वाहतूक ठप्प पडल्याने शेतमाल मार्केटला नेता आला नाही. त्यामुळे फळे भाज्या शेतातच साडू लागल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नगर चालवावा लागला. यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. ग्रामीण भागासह शहरातही रोजगार बंद पडल्याने शेतमजूर व हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली. बंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भावही वधारले आहेत. आधीच कोरोनाची धास्ती व त्यातच उदर्निवाहाची चिंता या विवंचनेत शहरी व ग्रामीण मजूरवर्ग कसेबसे दिवस काढत आहे. दिवस उजाडताच त्यांना आस लागते ती पोटाच्या भाकरीची त्यामुळे आज कोण मदतगार अन्न वा धान्य पुरवेल या कडे त्यांच्या नजरा लागलेल्या असतात. येरव्ही गावखेड्यातील ग्रामपंचायत, तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपरिषद असो किंवा विधानसभा लोकसभेची निवडणूक असो प्रत्येक मातब्बर पुढारी स्वतःहून जनतेच्या भेटीगाठी घेऊन त्यांना वाटेल ती मदत देण्यासाठी सरसावतो. निवडून येण्याकरिता दोन्ही हातांनी पैशाची उधळण करतो. त्यात कोणी निवडून येतो तर कोणी पराभूत होतो. याची पर्वा न करता निवडणूक काळात ओल्या पार्ट्यांची रेलचेल असते. चिकन मटनानच्या मेजवान्या दिल्या जातात. वाहनांवर वारेमाप खर्च केल्या जातो. निवडणुकीचे आठ दिवस मतदारराज्याची खबरदारी घेणारे ते पुढारी व त्यांना संकटसमयी मदतीची ग्वाही देणारे शेकडो हात या संकटात कुठे लुप्त झाले आहेत हेच कळेनासे झाले आहे. निवडणुकीत वारेमाप पैशांची उधळण करणारे हे पुढारी आता कोठे आहेत असा प्रश्न यावेळी या मजूरवर्गातून उपस्थित होतो आहे.

काही लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांना काही अंशी मदत दिली आहे पण निवडणूक काळात ज्याप्रमाणे तत्परता दाखवण्यात येते तशी संकटसमयी दाखविली जात नसल्याची खंत शेतमजूर व हातमजूर वर्गातून व्यक्त केल्या जात आहे. वाणी तालुक्यात अनेक श्रीमंत पुढारी आहेत अशा वाईट परिस्थितीत त्यांच्याकडून पोत्याने मदतीची अपेक्षा होती परंतु सॅनिटाइजर व छोटे छोटे धान्याचे पॅकेट देऊन त्यांनी आपले हात झटकल्याचे शहरात बोलल्या जात आहे. निवडणुकांमध्ये पैशांची उधळण करणारे हात कोरोना संकटात गेले तरी कुठे हीच चर्च्या सर्वत्र ऐयकायला मिळत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share