WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

टाॅपवर्थ उर्जा एड मेटल्स तर्फे गरजूंना अन्नधान्याची किट वाटप

Image

वणी शहर प्रतिनिधी:- *निलेश चौधरी*

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्रात सुध्दा लाॅक डाऊन ची परिस्थिती उद्धभवली आहे. या लाॅक डाऊन मुळे ,गोर गरीबांचा व मजुरांचा रोजच्या जिविकेचा प्रश्न पडला आहे. त्यामुळे सामाजिक घडकातील व्यक्ती समोर येऊन गरजूंना आपल्या परीणे योगदान देण्याचे कार्य करीत असतात. असेच सामाजिक दायीत्वाचे भान ठेवून ,टाॅपवर्थ उर्जा एक मेटल्स कंपनी कडुन अर्धवन, पांढरकवडा(ल) ,भेंडाळा ,रायपुर ,पाटन,खरबडा, बिरसापेठ ,या गावातील गरजूंना अन्नधान्याचा साहित्या चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार जोशी साहेब, नायब तहसीलदार खिरेकर साहेब, मंडळ अधिकारी चांदेकर साहेब ,निमकर साहेब, तलाठी इरनकर साहेब, तसेच कंपनी तर्फे श्री. अरुन वैद्य, सहाय्यक महाप्रबंधक आनंद नायगावकर, राजेश कापनवार, मायनिंग ऑफिसर बम बम सिंग ,मुकेश आसुटकर,उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले