WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित

Image

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे. 26 एप्रिल रोजी सकाळी पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेले सात रुग्ण सुरवातीला संस्थात्मक विलगीकरणात भरती होते. मात्र त्यांचे पॉझेटिव्ह अहवाल प्राप्त होताच त्यांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. तर दुपारी आणखी 9 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे दिवस•ारात 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता 50 पॉझेटिव्ह रुग्णांसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.रविवारी एकूण 39 जण नव्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहेत. नागपूर येथे तपासणीकरीता आज 64 नमुने पाठविले असून सद्यस्थितीत 264 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. संस्थात्मक विलगीकरणात 166 जण तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले