WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा

Image

मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषेच्या निवडणुकी घेण्याची परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदरकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानुसार, विधानपरिषदेची निवडणूक घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती राज्यपाल यांनी निवडणुक आयोगाला केली होती. राज्यपालांच्या या विनंतीनंतर निवडणुक आयोगाने राज्यातील विधान परिषच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. आता, राज्यातील ९ जागांंसाठी घेण्यात येणार्या या निवडणुका २१ मे रोजी पार पडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत, तसेच राज्यातील राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल, असेही म्हटले. महाराष्ट्राची पुण्याई मोठी म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला, असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले