WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महारक्तदान शिबीरात 115 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Image

युवक, युवती, पत्रकार, महिलांचाही सहभाग

यवतमाळ - प्रति.

कोरोना संसर्ग - 19 महामारीमुळे यवतमाळ शहरातील शासकीय रुग्णालय व अनेक खाजगी रुग्णालयात रुग्णांकरिता रक्ताची आवश्यकता असून यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटना व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 9 मे रोजी सकाळी 8 ते 12 पर्यंत शिवशक्ती लॉन स्टेट बँक चौक यवतमाळ येथे महारक्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबीरात यवतमाळ शहरातील युवक, युवती, पत्रकार व महिलांनी सुद्धा सहभाग नोंदवून 115 रक्तदात्यांनी या महारक्तदान शिबीरात रक्तदान केले. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीेच्या डॉ. जागृती पालव, समाज सेवा अधिक्षक मोबीन दुंगे, आशिष खडसे, दिनेश चांदेकर, प्रदीप वाघमारे, प्रतिक मोटे, दिलीप केराम या चमुने रक्तदात्यांचे रक्त संकलीत करुन रक्तदाना संदर्भात मार्गदर्शन केले. या महारक्तदान शिबीराला यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. कांचनताई बाळासाहेब चौधरी, नगर सेविका कीर्तिताई राऊत, नगर सेविका वैशाली सवई, शहर पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन लुले आदि प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या रक्तदान शिबीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला होता.

या शिवीराचे मुख्य संयोजक शैलेश करिहार यांच्या मार्गदर्शनात या भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी स्व प्रेरणेने येऊन सोशल डिस्टेसिंगचा पालन करीत रक्तदान शिवीरात येऊन रक्तदान केले. या शिवीराच्या यशस्वीतेसाठी महारक्तदान शिबीराचे संयोजक शैलेश करिहार संचालक एस. के. ऑटोडिल, यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अर्गुलवार, विजय कुमार बुंदेला, सचिव निलेश ताटीपामुलवार,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share