WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गटई कामगारांना शासकीय मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग) व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी चा पाठपुरावा...

Image

*वणी: लॉकडावूनच्या या हलाखीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गटई कामगारांना शासकीय मदत व गटई दुकानदाराना एका ठराविक वेळेत दुकान लावण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग)व संत रविदास महाराज चर्मकार युवा मचं वणी तर्फे वणी विधानसभा चे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले.*

*कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पूर्ण देशभर लॉकडाऊन लावले त्यामुळे गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली,त्यामुळे शासनातर्फे या कामगारांना आर्थिक मदत देऊन ठराविक काळात दुकान सुरु करण्याची मुभा द्यावी असे निवेदन देण्यात आले.*

यावेळी *राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे, वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे,पुरड शाखा प्रमुख प्रवीण डूबे,राजकुमार खोले साहेब,राहुल भटवलकर* व *संत रविदास महाराज चर्मकार युवा मचं चे सदस्य निकेश बावणे, रामदास खोले, मिलिंद पिपळकर, किशोर हांडे, युवराज वाडेकर,पंकज वादेकर, विनोद ढेरे,किशन कोरडे* आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले