WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विवाहित युवकाची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या...देवाळा येथील घटना

Image

सचिन मेश्राम मारेगांव*(तालुका प्रतिनिधी)दि.१३

मारेगांव तालुक्यातील देवाळा येथील गणेश आत्माराम रोगे वय ३० या विवाहित युवकांनी देवाळा शिवारात दिलीप ठेकारे यांच्या शेताच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्यां केल्याची घटना मंगळवारला पाच वाजच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

देवाळा शिवारात असलेल्या ठेकारे यांच्या शेतात विहिरीत उडी घेवून जिवनयात्रा संपविली. शिवारात असलेल्या शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबांना ही माहिती कळविली. दरम्यान आत्महत्या केलेला हा विवाहित असल्याचे समजते त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक पश्चात पत्नी-तिन मुली, आई असा मोठा परिवार आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले