WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन.....

Image

माझा यवतमाळ माझा अभिमान :- पेन उचला यवतमाळ करांची ओळख महाराष्ट्राला करून द्या...

वणी :- सुरज चाटे

यवतमाळ जिल्हा अनेक महान व्यक्तींची मातृभूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात असणारे स्वातंत्र्यसैनिक, राज्याचे नेतृत्व करणारे मंत्री यांच्यापासून ते सीमेवर उभे राहून देशाचे संरक्षण करणारे जवान व आपल्या शेतात पांढर सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत अनेक व्यक्तींची दळणघडण यवतमाळच्या मातीत झाली आहे. त्यामुळे संजय राठोड पालक मंत्री यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर पराग पिंगळे जिल्हा प्रमुख शिवसेना व राजेंद्र भाऊ गायकवाड जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या सहकार्याने जिल्हा युवा सेना प्रमुख विक्रांत चाचडा व आदींच्या पुढाकाराने निबंध स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आदर्श असणाऱ्या, तुम्हाला जगण्याची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींबद्दल हजार ते पंधराशे शब्दांचा निबंध लिहायचा आहे. मग पेन उचला आणि आपल्या यवतमाळ करांची ओळख महाराष्ट्राला करून द्या ही स्पर्धा दि.१२/०५/२०२० ते १८/०५/२०२० पर्यंत खुली राहील, स्पर्धा फक्त यवतमाळ जिल्ह्यातील युवकांसाठीच मर्यादित असून,ज्या व्यक्तीबद्दल स्पर्धक निबंध लिहणार आहेत ती व्यक्ती देखील यवतमाळ जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे. सदर निबंध आपण यवतमाळ जिल्ह्यात जन्मलेल्या व उत्तुंग कर्तृत्व करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर लिहू शकता उदा. स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी , समाजकारणी , सहकारातील व्यक्ती , प्रशासकीय अधिकारी , उद्योगपती , आपले पालक , आपला मित्र , आपल्या गावातील शेतकरी सदर निबंध yuvasena.yavatmal@gmail.com

या मेल वरती पाठवायचे आहेत. यात विजयीना आकर्षक बक्षीस सुद्धा देण्यात येणार असून, सहभाग नोंदवीणाऱ्याचे पूर्ण नाव आणि पत्ता,आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे तरी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share