WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

डोंगरगाव (वेगांव) येथील शिवारात वाघाचा गाईवर हल्ला..... हल्ल्यात गाय गंभीर :- लॉक डाऊनमुळे जंगली जनावरांची वस्तीकडे भटकंती....

Image

वणी :- सुरज चाटे

वणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव (वेगांव) येथील शिवारात सोमनाळा घाटाच्या थळीवर वाघाने गाईवर हल्ला चढविल्याने गाय हल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 20 ला घडली आहे.

विरकुंड येथील महादेव चवले यांच्या मालकीची गाय चरण्याकरिता गेली असता जंगल परिसर लागूनच असल्याने सदर मोकाट जनावर पाहून वाघाने आपला डाव साधत हल्ला चढविला हल्यात गायीला गंभीर इजा झाली आहे. सदर घटना शेतीवरील मजुराच्या लक्षात येताच घटनेची माहिती वन विभाग व आदींना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व वन विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

सध्या लॉक डाउन असल्याने पाहिजे तशी जंगल परिसरात रेलचेल नसल्याने जंगली जनावरांनी आपला मोर्चा आता वस्तीकडे वळविला असून त्याना जंगल परिसरात कुणी न दिसल्याने हिमत्तीने गावाच्या दिशेने जंगली जनावर येऊन जनावरांवर हल्ला करीत असल्याच्या घटना समोर येत आहे त्यातच नागरिकांनी देखील सावधान व सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले