WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी घूगूस मार्गावरील पुणवट येथे टरबूज भरलेला ट्रक पलटी

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-
वणी घुगुस राज्य महामार्गावरील पुणवट येथे टरबूज भरलेला ट्रक पलटी झाल्याने त्यात जवळपास ८० हजार रुपये किमतीच्या टर्बुजांची नासाडी झाल्याने टरबूज उप्तादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. उन्हाळ्यामध्ये टरबुजांची मागणी वाढत असल्याने मराठवाड्यातील टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात व्यवसाया करिता विदर्भात येतात. अशाच काही नांदेड येथील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी चंद्रपूर येथील व्यापाऱ्याकडे विक्री करिता आणत असलेल्या टरबूज भरल्या ट्रकला अपघात होऊन तो पलटी झाल्याने टरबुजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे ८० हजारांचे आर्थि क नुकसान झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले