WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलिसाला दांडक्याने हल्ला करून केलं ठार

Image

मारेंगाव :- आरोपीने केलेल्या हल्ल्यात एका पोलीसाचा मृत्यू तर दोन किरकोळ जखमी..

सुरज चाटे वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात आरोपीने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकातील एका जमादाराला आरोपीने लाकडी दांड्याने तोंडावर मारून जागीच ठार केलं तर इतर दोन पोलीस देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

Image राजेंद्र कुळमेथे असं मृत्यू झालेल्या पोलीस जमादाराचं नाव आहे. मारेगावच्या हिवरी येथील ही धक्कादायक घटना आहे. अनिल मेश्राम असं रोपीचं नाव आहे. त्याविरोधात अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टीम आरोपीच्या घरी गेली होती. Image

पोलिसांनी आरोपीला बाहेर येण्यास सांगितलं. पण मी बाहेर येणार नाही तुम्हाला जे करायचं आहे ते करा अशी दादागिरी आरोपीने केली. त्यानंतर काही घडताच त्याने दरवाजा उघडला आणि पोलीस पथकावर हल्ला केला.

त्याने 3 पोलिसांवर हल्ला केला. लाकडी दांडक्याने 3 पोलिसांवर हल्ला केला. यात 3 पोलीस गंभीर जखमी झाले. पण उपचारादरम्यान पोलीस जमादार राजेंद्र कुलमेथे यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमी पोलिसांचा नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आरोपी अनिल आणि त्याच्या आईवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर घटनास्थळावरून पोलिसांवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं लाकडी दांडकंदेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share