WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपूरकडे निघालेल्या मालगाडीचे डब्बे घसरले

Image

वर्ध्याकडून चंद्रपूरकडे जाणा-या पार्सल रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात टळला, ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानकावर घडली. लॉकडाऊन असल्याने रेल्वेने साहित्याची ने-आण करणे सुरू आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास आठ डब्ब्यांची मालगाडी वर्ध्याकडून चंद्रपूरकडे पार्सल घेऊन जात होती.

बजाज चौकातील उड्डाणपूल à¤ªà¤¾à¤° करताच रेल्वेगाडीचे पाच आणि सहा क्रमांकाचे दोन डबे अचानक रूळावरून घसरले. पाच क्रमांकाच्या डब्याचे एक चाक आणि एक स्प्रिंग तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. ही मालगाडी चौथ्या लाईनवरून जात असल्याने अप-डाऊनच्या मुख्य à¤²à¤¾à¤ˆà¤¨à¤µà¤° याचा प्रभाव पडला नाही.  मालगाडी दुरुस्तीचे काम सुरू असून, चार ते पाच तास दुरुस्तीचे काम चालणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share