WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगांवच्या युवकावर नागपूरात बलात्काराचा गुन्हा दाखल, विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक शोषण ;पिडीत महिला दोन महिन्याची गर्भवती

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव-यवतमाळ)

मारेगांव- वैवाहिक जीवनात पतीसोबत नेहमीचा वाद विकोपाला जात असताना तिने आपल्या अपत्यासोबत माहेर गाठले अशातच नातेसंबंधातील युवकाने पीडित महिलेसोबत सलगी साधत लग्न करण्याचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण करीत गर्भवती राहिल्याने त्या युवकांने गावाकडे पोबारा केला. पिडीतीने वारंवार फोन करुनही प्रतिसाद देत नसल्याने अखेर पिडीत महिलेने नागपूर येथील कपील नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने मारेगांव तालुक्यातील शिवणी धोबे येथील तीस वर्षीय युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर येथील समता नगरात वास्तव्यात असलेली विवाहित महिला मागील अनेक दिवसांपासून पतीच्या वादाने माहेरी होती. या दरम्यान नातेसंबंधातील मारेगांव तालुक्यातील शिवणी धोबे येथील विपिन दाते हा काही दिवसासाठी नातेवाईक म्हणून त्यांच्याकडे वास्तव्य करू लागला. पिडीत महिलेसोबत सलगी साधत लग्न करण्याचे आमिष दाखवित 30 वर्षीय पिडित महिलेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसातच लग्न करण्याचा आणाभाका घालून विपीनने स्वगांवाकडे पोबारा केला.

पिडीत महिलेची वारंवार प्रकृती बिघडत असल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेली असता ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी विपिनला फोन करीत असतांना त्याचे वाहिनीने पीडितेस विपिनचे इकडे लग्न जुळल्याचे सांगितले. त्यामुळे दिवसागणिक पोटातील अंकुराची वाढ होत असतांना आपली फसगत झाल्याची तिच्या लक्षात येताच थेट कपिल नगर पोलीस स्टेशनं गाठून विपीन विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार विपीन दाते यांचेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर पोलीस त्याचे मागावर आहे. पिडीतेला न्याय मिळवून देण्यसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता ठाकरे..हाफिज साबरी यांनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share