WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अज्ञात वाहनाच्या धडकेत भांदेवाडा खदानीतील कर्मचारी ठार

Image

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या पळ्सोनी फाट्याजवळ घडली. सिताराम बापुराव बेलेकर (57) रा. पळ्सोनी असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वेकोलीच्या भांदेवाडा खदानीत कार्यरत असलेले सिताराम बेलेकर हे 15 तारखेला खदानीतील कर्तव्य बजावुन पळ्सोनी या आपल्या गावी परतत असतांना पळ्सोनी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अद्ण्यात वाहनाने जबर धडक दिल्याणे ते गंभीर जख्मी झाले. अत्यावस्थ स्थितीत त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चंद्रपुर येथे रेफर करण्यास सांगितले. चंद्रपुरला नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनधारका विरुध्द भादवीच्या कलम 279,304(क) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले