शहरात आणखी दोनव्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली बारा !



प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज आणखी दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १२ वर पोहचली आहे. एकूण १९ व्यक्तींचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर ४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४ जूनला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. त्यापैकी ४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता आता आठ वर आली आहे. बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी २ जण नागपूर येथे तर २ जण यवतमाळ येथे उपचार घेत होते. आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.