WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील गोवारी पार्डी गावात सहा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

Image

तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोवारी पार्डी या गावातील सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संताप जनक घटना ७ जुलैला उघडकीस आल्यानंतर काल १० जुलैला मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून त्यांच्यावर अट्रोसिटी व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या खेदजनक लैंगिक अत्याचार प्रकरणातील चारही आरोपी अल्पवयीन आहेत. गोवारी पार्डी या छोट्याशा गावात अशा प्रकारची मानवी विकृती दर्शवणारी निंदनीय घटना घडल्याने संपूर्ण गाव हादरलं आहे.

तालुक्यातील गोवारी पार्डी येथील सहावर्षीय बालिका गावातील परिसरात खेळात असतांना त्याठिकाणी ११ ते १५ वयोगटातील चार मुले आली व त्यांनी त्या बालिकेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने लैगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार चिमुकलीने आपल्या वडिलांना सांगितला. ७ जुलैला घडलेल्या या प्रकरणाची तक्रार मुलीच्या वडिलांनी १० जुलैला पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर भादंविच्या कलम ३६३,३७६(ड)(ब),५०६ तसेच बाल लैंगिक प्रतिबंध कायदा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे गाखाल करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत, वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे, विजय वानखेडे, योगेश ढाले, रवी इसनकर व आशिष टेकाडे यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले