तालुक्यात सहा पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, रुग्ण संख्या झाली 47
शहरातुन कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असतांना आज तेलीफैल परिसरात दवाखाना असलेल्या डॉक्टरांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.तसेच घोन्सा येथील 4 तर गणेशपूर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आज एकाच दिवशी 6 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात परत एकदा भितिचे वातावरण निर्मान झाले आहे. कोरोना संक्रमणाचे केंद्रबिन्दू ठरलेल्या तेलीफेल परिसरात 10 दिवसानंतर पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधीतांची संख्या 47 झाली असून ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सात झाली आहे.
शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होऊन तालुक्याची कोरोनामुक्तिकडे वाटचाल सुरू असतांना आज तेलीफैल परिसरात दवाखाना असलेला डॉक्टर पॉझिटीव्ह आल्याने या परिसरात नव्याने कोरोनाची साखळी तयार झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच ग्रामीण भागातही एकाच वेळी पाच रूग्ण आढळल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्मान झाले आहे. काल निगेटीव्ह टु पॉझिटीव्ह आलेल्या तरुणाचा नागपुर येथे मृत्यू झाला होता. तर आज तेलीफैल परिसरातील डॉक्टर पॉझिटीव्ह आल्याने शहरातही परत एकदा भितिचे सावट पसरले आहे. तालुक्यात आज एकुण 6 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहचला असून ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 7 झाली आहे. नागरिकांनी सावधानी बाळगन्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.