WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बोर्डा गावात सुरीचे घाव घालून युवकाला केले गंभीर जख्मी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

दारूच्या नशेत विनाकारण वाद घालून एका तीस वर्षीय युवकावर सुरीने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याची घटना तालुक्यातील बोर्डा गावात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली असून जख्मी अवस्थेत सदर युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पायाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊन डॉक्टरांनी जख्मी युवकाला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले आहे. बंडू माधव टिकट (३०) रा. बोर्डा असे या जख्मी युवकाचे नाव असून गंगाधर गोविंदा राऊत (५०) रा. बोर्डा या इसमाने त्याच्यावर हल्ला केल्याचे समजते.

मद्याचे व्यसन जडलेल्या गंगाधर याने दारूच्या नशेत बंडू याच्याशी विनाकारण वाद घालून याच्यावर सुरीने हल्ला चढवला. गंगाधर याने पोटावर सुरीचे वार करतांना हातावर वार झेलून स्वतःचा बचाव करतांना बंडू याच्या पायावर सुरीचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. स्वतःला वाचविण्याचा प्रयत्नात त्याच्या पोटावर व छातीवरही सुरीचे हलके घाव झाले आहेत. हल्लेखोर व जख्मी एकाच गावातील रहिवासी असून गंगाधर हा नेहमी बंडू याच्याशी विनाकारण वाद घालत असल्याचे समजते. घराशेजारी असलेल्या पानठेल्याजवळ बसून असलेल्या बंडूवर गंगाधरने अकारण वाद घालून सुरीने घाव घातल्याने तो गंभीर जख्मी झाला आहे. त्याच्या भावाने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असून वृत्त लिहेस्तोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस सदर इसमाला अटक करण्याकरिता गेले असता तो फरार असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले