WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बोर्डा गावात सुरीचे घाव घालून जख्मी करणाऱ्या आरोपीला अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील बोर्डा गावात एका ३० वर्षीय युवकाशी विनाकारण वाद घालून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोर्डा गावातील गंगाधर गोविंदा राऊत (५०) याने दारूच्या नशेत बंडू माधव टिकट (३०) याच्याशी नालीच्या वाहत्या पाण्यावरून विनाकारण वाद घालत सुरीचे घाव घालून गंभीर जख्मी केले. आरोपी गंगाधर राऊत याला दारूचे व्यसन जडले असून नशेत वादावादी करणे हा त्याचा स्वभाव बनल्याचे गावात बोलल्या जात आहे. घरा शेजारी असलेल्या पानठेल्याजवळ बसून असणाऱ्या बंडू टिकट याच्याशी विनाकारण वाद घालून त्याच्यावर सुरीने हल्ला चढवून त्याला गंभीर जख्मी केल्याची घटना काल साय. ५.३० वाजता उघडकीस आली. सुरीचे वार होत असतांना प्रतिकार केल्याने त्याचा कसाबसा जीव वाचला असून त्याच्या पायावर सुरीचा चांगलाच घाव बसल्याने गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी पायाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देत चंद्रपूरला रेफर करण्यास सांगितले. बंडू टिकट याच्या भावाने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गंगाधर राऊत याला अटक करून त्याच्यावर भादंविच्या कलम ३२६ नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले