WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

देशाला स्वातंत्र मिळून आज ७४ वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्याच्या या ७४ व्या वर्धापनदिना निमित्त उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तहसीलदार श्याम धमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासासह तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शासकीय, प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीतासह तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रहीत जोपासण्याची शपथ घेतली.

१५ ऑगष्ट १९४७ रोजी देश इंग्रजांच्या गुलामीतून आझाद झाला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होत. पण महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या जल्लोषात सहभागी झाले नव्हते. कारण देश स्वतंत्र झाला तेंव्हा महात्मा गांघी हजारो किलोमीटर दूर असलेल्या बंगालच्या नोआखलीमध्ये होते. याठिकाणी धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषणाला बसले होते. १५ ऑगष्ट रोजी भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना पत्र लिहून १५ ऑगष्ट हा आपला स्वातंत्र दिन असेल, तुम्ही राष्ट्रपिता आहात, यात सहभागी होऊन आशीर्वाद द्या, असे त्यांना कळविण्यात आले. मात्र महात्मा गांधी यांनी याठिकाणी धार्मिक हिंसाचारात जीव जात असतांना मी कसा काय येऊ, ही दंगल रोखण्याकरिता माझा जीव गेला तरी पर्वा करणार नाही असे पत्राचे उत्तर पाठवले. १४ ऑगष्टच्या मध्यरात्री पंडित नेहरू यांनी व्हाईसराय लॉज मधून (आजचे राष्ट्रपती भवन) ऐतिहासिक भाषण ( "ट्रिस्ट विथ डेस्टनी") दिलं. तेंव्हा पंडित नेहरू पंतप्रधान बनले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगानं ऐकलं पण महात्मा गांधी त्या दिवशी नऊ वाजताच झोपी गेले होते. १५ ऑगष्ट पर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषा निश्चित झाली नव्हती. याचा निर्णय १७ ऑगस्टला रेडक्लिफ लाईनच्या घोषणेद्वारे झाला. भारत १५ ऑगष्टला स्वतंत्र झाला पण त्यावेळी देशाचं स्वतःच राष्ट्रगीत बनलं नव्हतं. रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्येच 'जन गन मन" लिहिलं होतं, पण १९५० मध्ये त्याची राष्ट्रगीत म्हणून अधिकृत निवड झाली. १५ ऑगष्ट हा भारतासह आणखी तीन देशांचा स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगष्ट १९४५ ला जपान पासून दक्षिण कोरिया, १५ ऑगष्ट १९६० ला फ्रांस पासून कांगो तर १५ ऑगष्ट १९७१ ला ब्रिटन पासून बहरीन स्वतंत्र झाले होते. १५० वर्षाच्या गुलामी नंतर भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्याने १५ ऑगष्ट या दिवसाची भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे. या ऐतिहासिक दिनी राष्ट्रीय गीत गाऊन तिरंग्याला सलामी देण्यात येते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share