शहरातील एका महिलेला झाली कोरोनाची लागण तर सहा रुग्ण झाले कोरोनामुक्त !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील रजानगर येथे आज आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. सहा रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना उपचारांती सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन पाच झाली आहे. १३ ऑगष्टला दक्षिणेतून रजानगर येथे ईद निमित्त आलेल्या एका पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना कोविड केयर सेंटरमध्ये हलवून त्यांचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले होते. आज तेथीलच एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.
आज एकूण २५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २४ निगेटिव्ह तर एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. तर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होऊन पाच वर आला आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने शहरवासीयांबरोबरच प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे. आज एकूण ९७ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ६७९ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर एकूण ११०२ व्यक्तींची स्वाब तपासणी करण्यात आली आहे. १३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. कोविड केयर सेंटरला ४ व्यक्ती भरती आहेत. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह उरलेल्या पाच रुग्णांमध्ये ४ रुग्ण कोविड केयर सेंटरला तर एका रुग्णावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. तालुक्यात ९ कंटेनमेंट झोन असून ग्रामीण भागात सहा तर शहरात ३ आहेत. ५६ कोरोना बाधित रुग्णांपैकी ४९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहे तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने सक्रिय रुग्ण ५ राहिले आहेत. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.