WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील गणेशपूर हद्दीतील छोरीया ले-आऊट येथे कोरोनाचा शिरकाव, पॉझिटिव्ह रुग्ण झाले ६३

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील गणेशपूर हद्दीत येणाऱ्या छोरीया ले-आऊट या पॉश वस्तीत कोरोनाने शिरकाव केला असून कोविड योध्यालाच कोरोनाची लागण झाल्याने अन्य कोविड योध्यांसह छोरीया मधील नागरिक चिंतेत आले आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीत सदर व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६३ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. आज ५३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ५२ निगेटिव्ह तर एका पोलीस शिपायाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता पर्यंत एकूण ७५९ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहे. आज ३९ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती रहात असलेला परिसर फवारणी करून निर्जंतुक करण्यात आला आहे.

गणेशपूर हद्दीत येणारा छोरीया ले-आऊट परिसर प्रतिष्टीत लोकांची वस्ती म्हणून ओळखल्या जातो. या पॉश वस्तीत कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोना योद्धा म्हणून नागरिकांची सुरक्षा करणारा पोलीस बंधूच पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य सहकारी चिंतेत आले आहे. तर छोरीया ले-आऊट मधील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ११ ऑगस्टला गणेशपूर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर आज गणेशपूर हद्दीतीलच छोरीया कॉलनी मध्ये पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने गावातील नागरिक भीतीच्या सावटात आले आहे. १० ऑगस्टला मंगलमपार्क मधील २२ वर्षीय तरुण नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना कोरोनाने दगावला होता. आज पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीमुळे तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्य्या वाढून ६३ झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या १२ झाली आहे. आज आणखी ३९ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून आता पर्यंत ११४१ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. १२ सक्रिय रुग्णांपैकी १० रुग्ण कोविड केयर सेंटर मध्ये भरती असून २ रुग्ण यवतमाळ तेथे उपचार घेत आहे. परतीच्या मार्गावर असलेला कोरोना शहर व तालुक्यात परत एकदा सक्रिय झाला असून मागील काही दिवसांपासून दिवसाआड रुग्ण आढळून येत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share