दारुची तस्करी करणाऱ्या वाहनावर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
अवैधपणे देशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका चार चाकी वाहनावर कार्यवाही करुन देशी दारुसह नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बोधेनगर चिखलगाव येथे 27 ऑगस्टला रात्री 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास ही कार्यवाही करण्यात आली. तसेच आरोपिला अटक करुन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गणेश उस्तव सुरू असल्याने शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता गस्तिवर असलेल्या पोलिसांना बोधे नगर चिखलगाव येथे एका महिंद्रा पिकअप मध्ये अवैध देशी दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून बोधे नगर चिखलगाव येथे उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला ताब्यात घेतले. MH 49 D 7064 या महिंद्रा पिकअप वाहनात राजू शंकर आत्रम (22) रा. गोकुळनगर हा आरोपी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे 180 मि.ली. चे 77 बॉक्स तर 90 मी.ली. चे 88 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी 4 लाख 21 हजार 300 रुपये किमतीची देशी दारू तसेच दारू तस्करी करिता उपयोगात आणलले महिंद्रा पिकअप वाहन अंदाजे किंमत 5 लाख रुपये, असा एकुण 9 लाख 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणपतीचे विसर्जन अगदीच जवळ आले असतांना विसर्जन काळात दारुची दुकाने बंद रहात असल्याने अवैध दारूचा तूटवाडा भासू नये म्हणून अवैध मार्गाने दारुची तस्करी करण्याकरिता अवैध दारू विक्रेते सरसावले आहेत. चोरट्या मार्गाने दारू तस्करी करण्यात येत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध दारू विक्रेत्यांचा हा प्रयत्न फसला आहे. राजू शंकर आत्रम रा. गोकुलनगर या आरोपीच्या माध्यमातून अवैध दारू विक्रेत्यांचे मोठे रॉकेट गळाला लागू शकते. शहर व तालुक्यात अवैध दारू विक्रिचे प्रमाण चांगलेच वाढले असून अवैध दारू विक्रेतेही चांगलेच निर्ढावले आहेत. आजच्या या कार्यवाहीने अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असले तरी अवैध दारू तस्करीतले मोठे मासे गळाला लागल्या शिवाय अवैध दारू विक्रिवर अन्कुश लागणार नाही. पोलिसांनी 4 लाख 21 हजार 300 रुपयांची देशी दारू व 5 लाख रुपये किंमतीचे महिंद्रा पिकअप वाहन असा एकुण 9 लाख 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी राजू शंकर आत्राम याच्यावर भादंवि च्या कलम 269,188 व सहकलम 65 (अ)(ई), 82,83 मदाका नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नी. वैभव जाधव, डिबी पथकाचे गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली आहे.