शहरातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या झाली 152
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत असून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाला हादरऊन सोडत आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याच्या मार्गावर असून ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता आरोग्य विभाग दिवसरात्र झटत असून प्रतिबंधित क्षेत्रा बरोबरच कोविड केयर सेंटर मधिल व्यक्तींचीही योग्यरित्या काळजी घेण्यात येत असतांनाही कोरोना संक्रमनाची गती कमी होतांना दिसत नाही. आज आणखी 4 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याणे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 152 झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 85 झाली आहे.
शहरात दिवसा गनिक कोरोनाचे रुग्ण आढळत असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोनाच्या दहशतीत प्रत्येक जीव वावरतांना दिसत आहे. साधा सर्दी खोकलाही झाला की, अंगाचा थरकाप उडतांना दिसत आहे. सर्दी खोकल्याचा रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे गेला की, डॉक्टरच भयभित होऊन शासकीय रुग्णालयाचा रस्ता दाखवतात. अन्य कोणताही गंभीर आजार जडला तरी कोरोनाची चाचणी करावी लागत आहे. अन्य कोणत्याही प्रकारच्या आजाराने अत्यवस्थ स्थितीत असलेल्या व्यक्तीला भरती करुन घेतांना खाजगी रुग्णालयातील डॉक्टर कचरत आहे. आधी शासकीय रुग्णालयातून कोविडची चाचणी करण्याचा सल्ला दिल्या जात आहे. कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून आता डॉक्टारांमध्येच भितिचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अन्य कोणताही आजार जडला तरी कोरोनाची टेस्ट करावी लागत असल्याने कित्येक व्यक्ती दवाखान्यात जाण्याचेच टाळतांना दिसत आहे. कोरोनामूळे अन्य आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात डॉक्टारांनाच कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांमधील भिती आणखीच वाढली आहे. एकुणच नागरिकांबरोबरच आता कोविड योध्यांमधे सुद्धा कोरोनाची चांगलीच धास्ती निर्माण झलेली पाहायला मिळत आहे. आज पॉझिटीव्ह आलेले चारही रुग्ण सानेगुरुजी नगर येथील आहेत. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 152 झाली असून 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 85 झाली आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करित असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.