तालुक्यात आज ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २५१ झाली !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. शहरात कोरोनाचा कहर वाढतच असून ग्रामीण भागातही कोरोना विषाणूची चांगलीच बाधा होतांना दिसत आहे. शहरात कोरोना संक्रमणाची गती तीव्र झाली असून दर दिवशी कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने प्रशासन हादरले आहे. आज ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५१ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. आज आणखी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला असून ३२ व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. रंगारीपुरा येथील ६० वर्षीय व्यक्तीचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तो १ सप्टेंबर पासून शासकीय रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होता. त्याच्या मृत्यूने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ३ झाली आहे.
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत असून दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही चांगलेच हादरले आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने कोरोनाचे संक्रमणही चांगलेच वाढले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या उपाययोजनाही तोडक्या पडतांना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या रुग्ण सेवेवरही चांगलाच प्रभाव पडतांना दिसत आहे. रुग्णांची संख्या तीव्र गतीने वाढत असून रुग्णांची व परिसरातील नागरिकांची काळजी घेतांना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आज ४४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ११ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ३३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १२९२ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून १८०७ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ३३ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २८० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज रंगारीपुरा येथील ६० वर्षीय रुग्णाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ३ झाली आहे. आज आणखी ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३५ रुग्ण कोविड केयर सेंटरला भारती असून ३१ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर ११ रुग्णांवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्यस्थितीत ७६ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात ६० प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह असून शहरात ४१ तर ग्रामीण भागात १९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. आज ११ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५१ झाली असून १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये लक्ष्मी नगर येथील एक, भालर दोन, कैलासनगर एक, विठ्ठलवाडी येथील दोन, माळीपुरा एक, जैन ले-आऊट एक, काळे ले-आऊट एक, जुने कॉटन मार्केट एक तर प्रगती नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथील रुग्णांची संख्या वाढत असून याठिकाणी आतापर्यंत ७ रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.