WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उकणी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरूच असून युवा पिढी जीवनापासून वैताल्यागत आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. एकामागून एक होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका चांगलाच हादरला आहे. कुटुंबाचा आधारवड असलेली युवापिढी जीवन जगण्याची आस हरपल्यागत मृत्यूला जवळ करत असल्याने कुटुंबावर चांगलाच आघात होतांना दिसत आहे. कुटुंबाचा आधार बनण्याऐवजी युवा पिढी मृत्यूचा आधार शोधत असल्याने जीवनावर मृत्यू विजय मिळवितांना दिसत आहे. उकनी येथील २८ वर्षीय युवकाने आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मोहर्ली गावापासून काही अंतरावर झुडपात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने उकनी या गावात एकच खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. आकाश दिवाकर दर्वेकर रा. उकनी वय अंदाजे २८ वर्षे या ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील ड्रायव्हर युवकाने आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला आहे.

अत्यंत सुस्वभावी व मेहनती असलेल्या आकाश दर्वेकर या युवकाचे तीन ते चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तर लग्नानंतर तीन महिन्याच्या संसारातच त्याचा घटस्फोटही झाल्याचे समजते. शहरातील नामांकित कोल ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये त्याने बरेच दिवस कोळशाचे टिप्पर चालविल्यानंतर आपल्या मेहनत व योग्य ड्रायव्हरकीच्या आधारावर गौरव व्हाल्वो प्रा.ली. या कंपनीमध्ये आपले स्थान पक्के केले. सध्या तो निलजई येथील गौरव व्हॉल्वो कंपनीमध्येच कार्यरत होता. त्याला आई वडील व एक मोठा भाऊ आहे. लग्न झाल्यानंतर मानसिक संतुलन ढासल्यागत तो वागत असल्याचे समजते. काही दिवसांआधी एकटाच नदीवर गेल्याचे भावाच्या लक्षात आल्यानंतर त्याने धाकदपट करून परत आणल्याचे कळते. आज त्याने अगदीच टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येसारखा पर्याय निवडल्याने कुटुंबावर चांगलाच आघात झाला आहे. युवा अवस्थेत पदार्पण केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यानंतर कुटुंबाचा आधार बनून आई वडिलांच्या परिश्रमांचे फलित करण्याची वेळ आली असतांनाच युवापिढी लाचार होऊन आत्महत्येसारखे पर्याय निवडत असल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळत असून वृद्ध मातापित्यांचा आधारच हिरवाल्या जात आहे. मुलगा कमावता झाला की, कुटुंबाचं पाठबळ वाढतं, पण युवापिढी स्वतःच जगण्याचा भार न पेलल्यागत आत्महत्यांचे मार्ग निवडत असल्याने वृद्ध मातापित्यांचे आधारकवचंच हिरावले जात आहे. हे आत्महत्यांचं सत्र कुठेतरी थांबलं पाहिजे यावर चिंतन करण्याची वेळ आता आली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share