WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वर्धा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन चुलत बहिणी गेल्या वाहून !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

धुनी धुण्यासाठी वर्धा नदीवर गेलेल्या दोन सख्या चुलत बहिणी धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या ओढ्यात वाहून गेल्याचे प्रकरण गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोना या गावी उघडकीस आले. शुक्रवारी घटनास्थळापासून ११ किमी अंतरावर मासे पकडणाऱ्यांना त्यातील एक बहीण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तर एका बहिणीचा अद्याप थांगपत्ता लागला नसून तिला शोधण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरु आहे.

शहरापासून ८ किमी अंतरावर असलेल्या कोना या गावातील दोन सख्ख्या चुलत बहिणी कपडे धुण्याकरिता वर्धानदीवर गेल्या. संततधार पावसाने आधीच नद्या दुथडी भरून वाहत आहे, त्यातच अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह वाढून अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने कोना या गावातील ज्योती श्रीकृष्ण परचाके(२०) व आंचल शंकर परचाके (१९) या दोन सख्ख्या चुलत बहिणी वाहून गेल्या. त्यातील ज्योतीला पोहता येत असल्याने ती घटनास्थळापासून ११ किमी अंतरावर मासेमारांना बेशुद्ध अवस्थेत आढळली तर आंचल हिचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून तिचे शोधकार्य सुरु आहे. ज्योती हिला बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे कळते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share