WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू !

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

टॅक्टरला मागून येणारी दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्याजवळ घडली. मारेगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या कारवाडी फाट्याजवळ बुरांडा येथील रहिवासी असलेल्या बळीराम गुंजेकर वय अंदाजे ४५ वर्ष, यांचा दुचाकीच्या अपघातात जाग्यावरच मृत्यू झाला.

मारेगाव येथील आपले काम आटपून बुरांडा या आपल्या गावी परत जातांना बळीराम गुंजेकर यांच्यावर काळाने झडप घातली. ते आपल्या दुचाकी क्रं. MH २९ ८४५५ ने गावाकडे जात असतांना त्यांची दुचाकी ट्रॅक्टर क्रं. MH २९ C ४५१४ ला मागून धडकल्याने त्यांना जबर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकींचा लाईट नादुरुस्त असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांमधून बोलल्या जात होते. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता प्राथमिक आरोग्य केंद्र मारेगाव येथे पाठवला. बळीराम गुंजेकर वय अंदाजे ४५ वर्ष रा. बुरांडा हे मजुरीचे काम करीत असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share