WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अनिस हॉल येथे जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना अटक, पोलिसांचे जुगारावर धाडसत्र सुरूच !

Image

*प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)*

वणी यवतमाळ रोड वरील अनिस हॉल मधील रूम नंबर ११४ मध्ये जुगार खेळल्या जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी काल रात्री धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सात आरोपीना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.

शहरातील अनिस हॉल मधील रूम नंबर ११४ मध्ये जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी काल रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास अनिस हॉल मधील रूम नंबर ११४ मध्ये धाड टाकली असता त्याठिकाणी सात आरोपी जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी आठही आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून ८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल केला आहे.आरोपींमध्ये रोहित गुरुमुख केशवाणी (२८), मनीष नंदकिशोर फेरवानी (२५), जैकी सुभाष तारूणा (२२), विजय मनोहर नागदेव (३०), संदीप संतोष केशवाणी (३०), यश श्रीचंद फेरवानी (३०), राहुल गोपी अहुजा (३१) सर्व रा. सिंधी कॉलनी यांचा समावेश असून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने जुगारावर धाड टाकली असता व्यापारी वस्थीतील व्यक्ती जुगार खेळतांना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात नापोकॉ विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, ईकबाल शेख , अशोक दरेकर, पोकॉ संतोष कालवेलवार यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले