WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात आढळले आज कोरोनाचे तीन रुग्ण

Image

corona update ११ oct

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून तालुक्यात अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. आज तालुक्यात कोरोनाचा तीन रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ झाली आहे.

आज ३२ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून एक पॉझिटिव्ह तर ३१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १२ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून २ पॉझिटिव्ह तर १० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २५ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४९ अहवाल अप्राप्त आहेत. आता पर्यंत एकूण ४७९५ व्यक्तींच्या आरटी पीसीआर व रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहे. आज तालुक्यात ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७५ झाली असून ६५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ वर आली आहे.

आज पोझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कायर येथील दोन तर सुंदर नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासनाचे कोरोनावर नियंत्रण असून नागरिकांनीही खबरदारीच्या नियमांचे पालन करून कोरोना वाढणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले