तालुक्यात आज पाच व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
corona update २३ oct
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात कोरोनाचे अतिशय कमी प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसल्याचे दिसून येत आहे. आज तालुक्यात पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची ७५५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. आज आणखी तीन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यात कोरोनाच्या प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत दिलासादायक घट झाल्याने तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. आज ५८ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर ५३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ३७ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १४ व्यक्तिंचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून ३१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. आता पर्यंत ५४४८ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५५ झाली असून ६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ११ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुरई येथील तीन, गणेशपूर येथील एक तर तेजापूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.