WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तलवार हातात घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शहरातील मोक्षधाम समोर हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सेवानगर येथील तरुणाला डीबी पथकाने अटक करून त्याच्यावर मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितिक अनिल बिसमोरे (१९) रा. सेवानगर असे या तलवारीने धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

लॉकडाउन शिथिल होताच शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात धुमाकूळ घालतानाच भाईगिरीचा प्रपोगंडा अवलंबला आहे. शहरात हाणामारीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. आता तर अपप्रवृतीच्या लोकांची मजल घातक शास्त्रांनी वार करण्यापर्यंत गेली आहे. पोलिसांची गुन्हेगारांवर असलेली वचक सैल होताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक न उरल्याने शहरात भाईगिरी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दीपक चौपाटी व त्या सभोलतालचा परिसर गुन्हेगारी कारवायांचा केंद्र बिंदू बनला आहे. या परिसरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती चांगलीच फोफावली आहे. दीपक चौपाटी येथे झालेल्या हाणामारीच्या घटनांत एकाचा बळी गेला आहे तर एकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज २४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास एक तरुण हातात तलवार घेऊन मोक्षधाम परिसरात धुमाकूळ घालत नारीकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठत तलवारीसह आरोपी रितिक बिसमोरे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर भादंवि च्या कलम २६९, सह कलम ४/२५ आर्म ऍक्ट, सह कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share