WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिवाच्या आकांताने तिने केलेल्या प्रतिकाराने वाचली तिची आब्रु

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यातील मजरा गावातील विवाहिता वासनांधतेचा बळी चढण्यापासुन थोडक्यात बचावली. वासनेने पिसाळलेल्या एका तरुणाने शेतात काम करित असलेल्या महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने केलेल्या तिव्र प्रतिकाराने ती थोडक्यात बचावली. हैवानाने त्या महिलेला जबर ओढताण करुन तिची नरडी दाबण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते. घटने पासुन सदर युवक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सदर घटना मजरा शेत शिवारात बुधवारी साय. 5 वाजताच्या सुमारास घडली.

सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील स्त्री पुरुष शेत पिकांची वेचनी सोंगनी करिता नित्य नियमाने शेतात राबतांना दिसतात. सदर महिलाही स्वताच्या शेतात शेत पिकाची वेचनी करत असतांना मजरा येथीलच मद्यधुंद तरुण शेतात शिरला व एकट्या महिलेला पाहुन त्याच्यातला वासनी हैवान जागा झाला. वासनेने आंधळलेल्या त्या युवकाने महिलेशी बळजबरी करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला पण तिने शक्तिनीशी केलेल्या तिव्र प्रतिकाराने तो दुष्कृत्य करण्यास अपयशी ठरला व महिला अतिप्रसंगापासुन थोडक्यात बचावली. महिलेने याबाबत पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरुन पोलिसांनी आरोपी रतिश हरिश्चंद्र गोंडे (27) रा. मजरा याच्यावर भादंवि च्या कलम 354 (A) (1), 354 (2), 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपिचा शोध पोलिस घेत आहे. आरोपी दारूच्या व्यसनाचा अधिन असून वडिलाचे छत्र हरपल्याने आईजवळ राहुन तो मोलमजुरी करतो. एकाच गावात रहात असतांना त्याने महिलेच्या आब्रुवर हात टाकण्याचा कीळसवाना प्रकार केलाच कसा, या चर्चेने अक्ख गाव दुमदुमल आहे. गावा पासुन शहरांपर्यंत महिलांची सुरक्षितता घोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. मारेगाव तालुक्यात पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतांना वनी तालुक्यात झालेला अत्याचाराचा प्रयत्न मनसातील विकृतीचे दर्शन घडवतो आहे. या विकृतीला लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटिल यानी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतांना पोलिस स्टेशन महिलांसाठी माहेर व मुलींसाठी आजोळ वाटायला हवे असे म्हटले होते. आज महिला व मुली पोलिस स्टेशन रुपी माहेराला साद घालत आहे की, या वासनेने पिसाटलेल्या राक्षसांपासून आमचे रक्षण करा व या राक्षसांना कायद्याची चांगलीच अद्दल घडवा. अत्याचार व विनयभंगाच्या वाढत्या घटनांवर जिल्हा व तालुका पोलिस प्रशासन अन्कुश लावण्यात कितपत यशस्वी ठरते याकडे संपुर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share