WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जुन्या वादातून तरुणाने गृहस्थाचे डोके फोडले

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

शुल्लक कारणावरून तरुणाने गृहस्थाच्या डोक्यावर काठीने मारून जख्मी केल्याची घटना ५ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तेलीफैल परिसरात घडली. याबाबत पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील तेलीफैल परिसरातील किशोर गांडा रापूसीया (५४) हा आपल्या घरा समोर शेळ्या बांधत असताना आरोपी अक्षय येंसांबरे (२२) रा. तेलीफैल याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लाकडी दंडुक्याने मारून पळ काढला. यात ते जख्मी झाले. काही दिवसांआधी किशोर रापूसीया यांनी रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या आरोपीच्या आईला बाजूला उभे राहण्यास सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेऊन आरोपीने संधी सादत रापूसीया यांच्या डोक्यावर मागून लाकडी फळीने वार करून त्यांना जख्मी केले. रस्त्यावर उभ्या असलेल्या आईला बाजूला होण्यास सांगितल्याचा राग मनात धरून अक्षय येसांबरे याने मनमोकळेपणाने घरासमोर शेळ्या बांधत असलेल्या गृहस्थाच्या डोक्यावर लाकडी फळीने मारून जख्मी केले. याबाबत किशोर रापूसीया यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अक्षय येसांबरे याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले