तालुक्यात आज आणखी नऊ व्यक्तींचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह
corona update ७ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यातील आज आणखी नऊ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१६ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ वर पोहचली आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७५९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसला असून रुग्णांची वाढती संख्याही रोडावली आहे. प्रतिदिन मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाल्याने रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. तालुक्यातील २३ व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर १८ तपासणी नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या ३२ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ४ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २८ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज आणखी ५६ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ८१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत. तालुक्यात आज नऊ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१६ झाली असून ७५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १९ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १० रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पळसोनी येथील दोन, शिंदोला दोन, सुकणेगाव एक, तर शहरातील चार रुग्णांचा समावेश आहे.