मागील पाच दिवसांत कोरोनाचे २२ रुग्ण आढळले तर दोन रुग्ण कोरोनाने दगावले
corona update १६ Nov.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
कोरोना संक्रमणाची गती मंदावली असली तरी कोरोनाची रुग्णवाढ संत गतीने सुरूच आहे. प्रतिदिन मोठ्या संख्येने आढळणारे कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोनाची साथ अद्यापही निवळली नसल्याने नागरिक कोरोनाच्या सावटातच वावरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पॉझिटिव्ह रुग्ण आढळतच आहेत. मागील पाच दिवसांत २२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७८ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ६१ झाले आहे. १२ नोव्हेंबरला दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा वाढून २३ वर पोहचला आहे.
थंड वातावरण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिकूल ठरत असल्याने वाढत्या थंडी बरोबरच कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन यशस्वी ठरल्वे असले तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. दर दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळतच असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हे. ते १६ नोव्हे. या पाच दिवसांत कोरोनाचे २२ रुग्ण आढळून आले तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १६ नोव्हेंबरला आठ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आठही व्यक्ती रॅपिड अँटीजेन द्वारा करण्यात आलेल्या चाचणीतून पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर १२ नोव्हेंबरला पुनवट व सुकणेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. १५ दिवसांपूर्वी शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या एका गावातील ड्रायवर व्यक्ती यवतमाळ येथे कोरोनाने दगावल्याची माहिती मिळाली आहे. हिवाळ्यात कोरोनाचा प्रकोप वाढण्याची भीती शासकीय स्तरावरूनही व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. हिवाळ्यात साथीच्या रोगांना चालना मिळत असल्याने कोरोना वाढीची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे. पाच दिवसांत २२ रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७८ झाली असून २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. १६ नोव्हेंबरला आणखी २५ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५३ अहवाल पेंडिंग आहेत.
काल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुरई येथील दोन, पटवारी कॉलनी येथील तीन, नायगांव खुर्द येथील दोन तर शास्त्री नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता हर संभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही जबाबदारीने वागून कोरोनाचा संसर्ग होणार याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.