WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन दोघांना केली अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले असून निर्भीडपणे अवैध रेतीची वाहतूक केल्या जात आहे. तस्करीच्या धंद्यातून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अनेकांनी या धंद्यात उड्या घेतल्या आहेत. अल्पावधीत लक्षाधीश बनण्याच्या लालसेपायी अनेकांनी तस्करीचे मार्ग निवडले आहेत. टाळेबंदीच्या काळात तस्करांना मोकळीक मिळाल्याने तस्करीतून चांगलीच उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेत तस्करांनी बिनधास्त अवैध रेतीची वाहतूक केली. पण आता पोलीस सतर्क झाले असून तस्कर पोलिसांच्या रडारावर आले आहेत. अवैध रेतीचे उत्खनन करून रेतीची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून चिखलगांव परिसरातून दोन रेती भरलेले ट्रॅक्टर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली. तसेच दोन आरोपीना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कार्यवाही २१ नोव्हेंबरच्या पाहटे २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रात्रीची गस्त घालत असताना पोलिसांना अवैध रेतीची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चिखलगाव येथील खुल्या परिसरातून अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. मुरधोंनी येथील नाल्यातून रेतीचे अवैध उत्खनन करून चोरून रेती आणणारे दोन ट्रॅक्टर क्रं MH २९ BC ९८८४ व MH २९ AK १५६३ ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपी गजानन मारोती वसाके (३१) व संतोष दत्तू आवारी (३४) दोन्ही रा. चिखलगाव याना अटक करून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३७९, सहकलम १३०(१), ५०(ए)/१७७ मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन ट्रॅक्टर किंमत अंदाजे १० लाख रुपये व दोन ब्रास रेती किंमत अंदाजे १० हजार रुपये असा एकूण १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डीबी पथकाच्या या धडक कार्यवाहीने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, सपोनि संदीप एकाडे, पोहवा सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, इम्रान खान, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पोकॉ पंकज उंबरकर यांनी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share