WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यात अवैध दारू विक्री व तस्करीला उधाण, अवैध देशी दारू विक्रीकरिता नेणाऱ्या तीन आरोपींना अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

चोरट्या मार्गाने देशी दारू विक्री करिता नेत असलेल्या तीन आरोपीना डीबी पथकाने शिताफीने अटक केली. टोल टॅक्स जवळ विना क्रमांकाच्या दुचाकीसह उभ्या असलेल्या तिघांवर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते गोंधल्यागत उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यात पोलिसांना त्यांच्या जवळ अवैध देशी दारूच्या शिश्या आढळून आल्याने पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. सदर कार्यवाही २३ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

शहर व तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले असून दारू तस्करीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तस्करांकरिता लॉकडाऊनचा काळ पर्वणीच ठरला असून या काळात अवैध दारू विक्री व तस्करी चांगलीच फोफावली असल्याचे दिसून आले. अवैध दारू विक्री व तस्करीच्या धंद्यात आता पांढरपेशांनीही उडी घेतल्याने या धंद्यात स्पर्धा निर्माण झाली असून अवैध दारू विक्रेतेच खबरी बनून प्रतिस्पर्ध्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहचऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी बरीच मंडळी दारू तस्करीच्या धंद्यात गुंतली असून त्यांना भाऊ दादांचे पाठबळ मिळत असल्याने ती चांगलीच निर्ढावली आहेत. आपले वरपर्यंत सेटिंग असल्याचे अवैध दारू विक्रेत्यांच्या तोंडून नेहमी ऐकायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूची मदार वणी तालुक्यावर असून वणी तालुका चंद्रपूर जिल्ह्याचा अवैध दारू पुरवठादार झाला आहे. चंद्रपूर जिल्हयाची दारूची तहान भागविण्यात वणी तालुका प्रमुख भूमिका निभावतो आहे. सकाळ पासून ठरलेल्या दारूच्या दुकानांवर दारू तस्करांची लगबग पाहायला मिळते. प्रवासी बॅगांबरोबरच स्कुल बॅगांमध्ये तर दुचाक्यांपासून चारचाक्यांमध्ये सोयीस्कररित्या दारूच्या शिश्या भरून तस्करांची चंद्रपूर जिल्हा वारी सुरु होते. तस्करीच्या या धंद्यामध्ये शाळा कॉलेजातील तरुण मुले व अल्पवयीन मुलेही जुडली असल्याचे समोर आले आहे. स्त्रियांचाही दारूची डिलेव्हरी पोहोविण्याकरिता उपयोग करून घेतल्या जात आहे. शहरातील एका दारू दुकानातुन मोठ्या प्रमाणात तस्करांकरिता दारूचा साठा उपलब्ध करून दिल्या जात असून सकाळपासून याठिकाणी तस्करांची व अवैध दारू विक्रेत्यांची रीघ लागलेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शहराबाहेर असलेल्या देशी दारूच्या दुकानांमधून धडल्याने देशी दारू तस्करांकरिता उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. शहराबाहेरील काही देशी दारूची दुकाने तस्करांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. या देशी दारू दुकानांमधून फोनवरूनच तस्करांसाठी दारूचे पार्सल तयार करून ठेवण्यात येते. अवैध दारू विक्रेत्यांना व तस्करांना दारू दुकानांमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने अवैध दारू विक्री व तस्करीला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. अवैध दारू विक्री व तस्करी रोखण्याकरिता आधी दारूचा साठा उपलब्ध करून देणाऱ्या दारू दुकानांवर लक्ष केंद्रित करून त्यांना रडारवर घेणे आवश्यक झाले आहे.

२३ नोव्हेंबरला डीबी पथकाने टोलटॅक्स जवळ अवैध दारू विक्रीकरिता नेण्याच्या बेतात असलेल्या तीन आरोपीना शिताफीने अटक केली. तीन पैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. अन्य दोन आरोपींमध्ये शैलेश वासुदेव कुळमेथे (१८), रोहन गोविंदा वरारकर (१९) दोघेही रा. चिखलगाव यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ६५(अ)(ई), १३०(१), १३०(३), १७७, ५० नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जवळून २४० नग देशी दारूच्या शिश्या अंदाजे किंमत १२४८० व विना क्रमांकाची दुचाकी किंमत २० हजार रुपये असा एकूण ३२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share