WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील सहा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Image

corona update २६ Nov.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९५३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९ झाली आहे. आज आणखी सात रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत.

आज तीन तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर आज करण्यात आलेल्या ५७ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ७२८३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी ३२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ९१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ७९ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये, १० रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये तर २६ रुग्णांवर यवतमाळ व इतरत्र उपचार सुरु आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये शास्त्रीनगर, एकतानगर, भालर कॉलनी, वागदरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले