उकणी खदानीत ट्रकच्या चाकाखाली दबून चालकाचा मृत्यू
कोळसा भरलेल्या ट्रकच्या चकामध्ये दबून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास उकणी खदानीच्या चेकपोष्ट जवळ घडली. मारोती सुनिल वरवाडे (24) रा. शिरपूर असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
उकणी खदानीतून वनी रेल्वे सायडिंगवर कोळसा भरुन येत असलेल्या डी टि सी कोल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकच्या चाकांमध्ये दबून त्याच गाडीच्या ड्रायव्हरचा दुर्दैवी अंत झाला. डीटिसी कंपनीची गाडी क्रमांक MH 34 AB 4565 उकनी खदानीतून कोळसा भरुन चेकपोष्टवर एण्ट्री करण्याकरिता ड्रायव्हरने उभी केली. गाडीची एण्ट्री करुन ड्रायव्हर गाडीजवळ आला असतानाच विरुद्ध दिशेने चेकपोष्टकडे भरधाव येणारा ट्रक अंगावर येईल या भीतीने सदर ड्रायव्हर बचावा करिता गाडीच्या चाकामध्ये शिरला असता उभी गाडी ढुलकल्याने गाडीच्या चाकामध्ये दबून मरोती सुनिल वरवाडे या ट्रक चालक युवकाचा करुन अंत झाला. अशी खदान परिसरात चर्चा आहे. अरुंद रस्त्यावरून अगदी तंतोतंत जागेत गाड्या पास होत असल्याने खदानीत अपघात वाढले आहेत.
उकणी चेकपोष्टकडे जाणारा रस्ता अगदीच अरुंद असून या रस्त्यावरून सुसाट वेगाने गाड्या धावतात. तंतोतंत जागेतून गाड्या पास कराव्या लागत असल्याने चालकांचा जीव नेहमी भांड्यात पडलेला असतो. चेकपोष्टवर नेहमी गाड्यांची वर्दळ रहात असून गाड्या नियमबाह्य पद्धतिने उभ्या केल्या जात असल्याने या ठिकणी नेहमी जाम लागताना दिसतो. रस्त्यावर कुठेही गाड्या उभ्या केल्या जात असल्याने रहदारीला अडथळे निर्माण होत असून गावाकडे जाणे येणे करणाऱ्या नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चेकपोष्ट पासून काही अंतरापर्यंत ट्रकांच्या रांगा लागत असून रस्त्यावर आडवी तिडवी वाहने लावली जातात. त्यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत असल्याने मनसेचे विभागीय अध्यक्ष बंडू बोन्डे यांनी उकणी खदानीचे सब एरिया यांना निवेदन देऊन अनियंत्रित वाहतुकीबाबत अवगत केले होते. पण उकणी खदानीच्या उपक्षेत्रीय प्रबंधकानी बंडू बोन्डे यांनाच रहदारीचे धडे शिकवीत रस्त्यावरील अनियंत्रित वाहतुकीकडे दुर्लक्ष केले. बंडू बोन्डे व सब एरिया यांच्यात अनियंत्रित वाहतुकीवरून वादावादी झाल्याचेही समजते. ट्रिप मारण्याच्या धुंदीत ट्रक चालक अती वेगाने गाड्या चालवीत मिळेल त्या जागी गाडी घुसवीन्याचा प्रयत्न करित असल्याने खदानीत गाड्या नेहमीच एकमेकांना भिडत असतात. ट्रिप मारण्याचे दिलेले टारगेट ड्रायव्हरांमध्ये स्पर्धा निर्माण करत असून याच स्पर्धेतून खदान प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे अपघात वाढु लागले आहेत. खदानीतील चेकपोष्ट जवळील अरुंद रस्ते व आडवी तिडवी उभी असणारी वाहने अपघाताना निमंत्रण देत असून अपघातात चालकांचे नाहक बळी जात आहे.