मागील सहा दिवसांत निव्वळ आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
corona update ५ Dec.
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)
तालुक्यात प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून कोरोनाची साथ हळूहळू निवळत असल्याचे दिसून येत आहे. मागील सहा दिवसात कोरोनाचे निव्वळ आठ रुग्ण आढळून आले आहेत. ४ डिसेंबरला तीन व ५ डिसेंबरला एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७७ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटून २६ वर आली आहे. मागील आठ दिवसांत तब्बल ४४ रुग्ण कोरोनातुन पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ९२८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाची प्रसारण क्षमता अगदीच कमी झाल्याने कोरोनाचे रुग्णही कमी प्रमाणात आढळत आहेत. ३० डिसेंबर ते ५ डिसेंबर या सहा दिवसांत कोरोनाचे जेमतेम आठ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. सहा दिवसांत कोरोनाचे तब्बल ४४ रुग्ण रुग्ण उपचारांती बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. ४ डिसेंबरला तीन तर ५ डिसेंबरला एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७७ झाली असून ९२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६ वर आली आहे. आज ६७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून एक पॉझिटिव्ह तर ६६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या २९ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट पूर्णतः निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ७७१८ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी २५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ८४ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ५ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ७ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत.
४ व ५ डिसेंबर या दोन दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथील एक, राजूर कॉलरी एक, लालगुडा एक, जैन ले-आऊट येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.