WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मागील पाच दिवसांत आढळले ३१ कोरोना बाधित रुग्ण

Image

corona update १७ Dec.

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. १३ डिसेंबर ते १७ डिसेंबर या पाच दिवसांत ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर पाच दिवसांत २३ रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांबरोबरच तालुक्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली असल्याने नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत ३१ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०६३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६७ वर पोहचला आहे. आता पर्यंत ९७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

तालुक्यातील कोरोना संक्रमणाचा वेग मंदावला असला तरी प्रतिदिन कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. संथगतीने वाढत असलेली रुग्णसंख्या हजारीपार गेली आहे. मागील पाच दिवसांत ३१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याने वाढत्या थंडी बरोबरच कोरोनाचा संसर्गही वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील पाच दिवसांत १२७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर ११७ व्यक्तींच्या करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. १३८ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. आता पर्यंत एकूण ८४१८ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ४३२५ आरटीपीसीआर चाचण्या तर ४०९३ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे.

१३ ते १७ डिसेंबर या पाच दिवसांत ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १३ डिसेंबरला सात कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यात मनीषनगर येथील दोन, देशमुखवाडी दोन, गुरुनगर, आवारी ले-आऊट, राजूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. १४ डिसेंबरला तालुक्यात एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. १५ डिसेंबरला १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या त्यात जी.प. कॉलनी येथील तीन, रासा दोन, भालर टाऊनशिप दोन, रंगारीपुरा, शिंदोला माईन्स, गणेशपूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे, १६ डिसेंबरला पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आल्या त्यात विठ्ठलवाडी येथील दोन, मनीषनगर, द्वारका अपार्टमेंट, गणेशपूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे, १७ डिसेंबरला ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात प्रगतीनगर येथील दोन, मुरधोनी दोन, विठ्ठलवाडी, दामले फैल, अटारा कॉम्प्लेक्स, चिखलगांव, मुकुटबन येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

विठ्ठलवाडी परिसरात परत एकदा कोरोनाने डोके वर काढले असून आठवड्याभरात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दचक निर्माण झाली आहे. विठ्ठलवाडी परिसरात आता पर्यंत ३४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. थंड वातावरण कोरोनाच्या संसर्गास पोषक असल्याने वाढत्या थंडी बरोबर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share