WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अवैध विक्रीकरिता दारू घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारास अटक

Image

प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)

अवैध दारू विक्रेते व दारूची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून अवैध दारूच्या धंद्यात गुंतलेल्यांचे अटकसत्र सुरु केले आहे. अवैध दारू विकणाऱ्यांचा पोलिस युद्धपातळीवर शोध घेत असून गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना अटक केली जात आहे. आज २२ फेब्रुवारीला एसडीपीओ कार्यालयीन पोलिसांनी अवैध विक्री करिता दारू घेऊन जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या जवळून १३ हजार रुपये किमतीच्या देशी दारूसह दुचाकी असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २२ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही धडक कार्यवाही केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलिसांना अवैधरित्या दारू विक्रीकरिता नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी माहितीच्या आधारे खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयमार्गे दामलेफैलकडे जाणाऱ्या रस्त्याने दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा शोध घेणे सुरु केले. काही अंतरावर पोलिसांना ज्युपिटर मोपेड दुचाकी पार्सल घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी दुचाकी वाहनाला थांबवून त्याची झडती घेतली असता समोर ठेवलेल्या पार्सलमध्ये देशी दारूच्या शिशांचे पाच बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिली क्षमतेच्या १०० नग देशी दारूच्या शिश्या आढळून आल्या. प्रत्येकी २६ रुपये नग याप्रमाणे १३ हजर रुपये किंमतीची देशी दारू व एक मोपेड दुचाकी MH २९ BG ४९३ असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच अवैध विक्रीकरिता दारू घेऊन जाणाऱ्या सौरभ उर्फ गोलू किशोर नगराळे (२०) रा. राजूर कॉलरी या आरोपीला अटक करून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध म.दा.का. च्या कलम ६५ (अ)(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही दारू त्याने दानव यांच्या देशी दारू दुकानातून खरेदी केल्याचे काबुल केले आहे. दारूची तस्करी करणारे व गल्ली मोहल्ल्यात अवैध दारू विकणाऱ्यांवर पोलीस बारीक लक्ष ठेऊन असून त्यांना हुडकून काढीत त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहे. शहरातून होणारी दारू तस्करी रोखण्याकरिता पोलीस हर संभव प्रयत्न करीत आहे. दारू तस्करांवरील मागील काही दिवसांतील धडक कार्यवायांमुळे दारू तस्करांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

पुढील तपास पीएसआय टिपूर्णे करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share