WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

'प्रहार' चे मुख्याधिकाऱ्यानां अल्टीमेटम

Image

पाईपलाईनचा प्रश्न न सुटल्यास प्रहार स्टाइलने अंदोलन करणयाचा इशारा

१४ मे (वणी)- बर्याच वर्षांपासून प्रभाग क्रमांक १० मधील संतांजी शाळे समोरील वसतीमध्ये पाईपलाईन प्रश्न प्रलंबित आहे.ते कधीही निकाली काढला गेलेला नाही.आजूबाजूला कष्टकरी ग़रीब जनतेची घरे आहेत. ते आपल जीवन रोज संघर्श करुन जगतात. या वस्तीमध्ये फक्त एक नळ आहे आणी तो पण रात्री १२ नंतर येतो. येथील लोक दिवसभर कष्ट करून स्वतःचं पोट भरतात आणी काम करतात.नळाच्या पाईपलाईनची सोय नसल्यामुळे त्यानां रात्र भर जागुन पाणी भरावे लागते. त्यामुळे त्यानां खुपच त्रास सहन करावा लागतो.गरिब लोकांची वस्ती असल्यामुळे समस्येकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.कित्येकदा सांगून सुद्धा प्रशासन दाद देण्यास तयार नाही.

मुलं, वृध्द आजारी पडत आहेत.कुणाचा जीव जायची वाट बघत आहे का प्रशासन ? असा सवाल अनिकेत चामाटे यांनी यावेळी उपस्थित केला.नगरपरिषद प्रशासनाला ४८ तासाचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. जर नळ पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरवात झाली नाही तर प्रहार स्टाईल ने अंदोलन करण्याचा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेने दिला आहे.यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे ,उप तालुकाप्रमुख साई नालमवार, तालुका सरचिटणीस अभिराज ब्राह्मणे ,शहर संघटक, प्रतिक कठाणे ,तालुका संघटक भरत उइके,तालुका सह संघटक तौफिक शेख, प्रतिक कोयचाडे, गौरव ताटकोंडावार आणी प्रहार चे कार्यकर्ते उपस्थीत होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share